Post Office Launched New Scheme : मित्रांनो, संपूर्ण देशभरात पोस्टाने एक नवीन बचत योजना सुरू केलेली आहे. ही योजना खास महिलांसाठी आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावे या उद्देशाने केंद्र सरकार ने 1 एप्रिल 2026 रोजी ही योजना सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत महिला आता पोसतातून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खरेदी करू शकणार आहेत. अर्थ मंत्रालयाने Mahila Sanman Bachat Patra 2026 साठी नवीन अधिसूचना जाहीर करतांना हे बचत प्रमाणपत्र देशभरातील 1 लाख 59 हजार पोस्ट ऑफिस मध्ये त्वरित उपलब्ध करून दिले आहेत.
या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने केली होती आणि आर्थिक समावेशन आणि मुलींसह महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. योजनेमध्ये 2 वर्षांच्या कालावधीसह लवचिक गुंतवणूक आणि आंशिक पैसे काढण्याचे पर्याय आहेत. यामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के चक्रवाढ व्याज तिमाही दराने मिळेल. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध राहणार आहे.